पावस : रत्नागिरी तालुक्यातील कसोप येथे कृषी विभाग आणि फिनोलेक्स कंपनी यांच्यामार्फत बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम झाला. त्यामध्ये फिनोलेक्स कंपनीतर्फे शेतकऱ्यांना मोफत भातबियाणे देण्यात आले.
कसोप येथील कार्यक्रमात कृषीविषयक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण अभियानांतर्गत फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, कृषी यांत्रिकीकरण, जलकुंड, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, अॅग्रीस्टेक, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, शेतकरी मासिक या संबंधी माहिती देण्यात आली. लहू शेलार यांच्याकडे भात बीजप्रक्रिया मोहीम, बियाणे उगवण क्षमता चाचणी यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 13/Jun/2025














