दापोली : दापोलीमधील केळशीच्या तलाठ्याला २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
१० जूनला दुपारी अडीचच्या सुमारास केळशीचे तलाठी राजेंद्र उंडे यांना दापोली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. उत्पन्नाच्या दाखल्याच्या अर्जावर स्वाक्षरी आणि शेरा देण्याकरिता ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) राजेंद्र उंडे यांनी २० हजारांची लाच मागितली होती, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 13-06-2025














