मंडणगड : गोपीनाथ मुंडे महाविद्यालयात ‘गुगल अर्थ अॅन्ड मॅपिंग’ या विषयाची कार्यशाळा

मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि डीबीजे महाविद्यालय, चिपळूण यांच्यावतीने डीबीजे महाविद्यालय चिपळूण येथे ‘गुगल अर्थ अॅन्ड मॅपिंग’ या विषयाची एक दिवसीय कार्यशाळा झाली. याचे आयोजन भूगोल विषयाच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी केले होते. यामध्ये ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन डीबीजे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. हनुमंत सुतार, डॉ. राहुल पवार, डॉ. राजू झोरे यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये दापोलीतील महिला महाविद्यालय, चिपळूणचे आनंदराव पवार महाविद्यालय, टेटवलीचे छत्रपती शाहू महाराज महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेमध्ये हनुमंत सुतार यांनी भौगोलिक माहिती प्रणालीचे महत्त्व व त्याचा दैनंदिन जीवनातील वापर’ याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. राजू झोरे व डॉ. राहुल पवार यांनी गुगल अर्थच्या साह्याने नकाशा बनविणे, नकाशातील अंतर मोजणे, रस्ता-रेल्वेमार्ग दाखविणे, आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 14/Oct/2024