दापोलीत कर्करोग शिबिरात आढळले १६ संशयित रुग्ण

दापोली : दापोलीत कर्करोग निदान व्हॅन तीन दिवस दापोली तालुक्यात आली होती. यावेळी ४२९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ६ रुग्णांची बायोप्सी करण्यात आली आहे.

आरोग्य सेवा बळकटीकरणसाठी व कर्करोगाचे लवकर निदान होऊन उपचार सुलभकरण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने ही तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे ३१३, प्रा. आ. केंद्र आसूद येथे ७१ व प्रा.आ. केंद्र पिसई येथे ४५ आशा रुग्णांची तपासणी करण्यात आली. संशयित रुग्णांचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यावर पुढील औषधोपचार सुरु करण्यात येणार आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

या मोहिमेत सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, सहायिका, समुदाय आरोग्य अभिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व आशा सेविका तसेच वालावलकर हॉस्पिटल येथील तज्ञांचे सहकार्य लाभले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, दापोली उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन सावंत व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 PM 13/Jun/2025