खेड : तालुक्यातील धामणंद येथे घरामागील डोहात बुडून एका ६९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. महेश चंद्रकांत सुर्वे असे मृत वृद्धाचे नाव असून, ते धामनंद येथील एस.टी. स्टँडजवळ राहत होते. बुधवारी पहाटे ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१० जून) दुपारी १२.३० ते ४.३० च्या दरम्यान ही घटना घडली. महेश सुर्वे हे घरातून बाहेर पडले होते. त्यांचा मुलगा सातबारा आणण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला होता. घरी परतल्यावर महेश सुर्वे दिसून न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. घराच्या मागील बाजूस असलेल्या नदीकडे गेले असावेत, असा विचार करून शोध घेतला असता, नदीच्या डोहाच्या किनारी ते पाण्यावर तरंगताना आढळून आले.
या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. बुधवारी रात्री २.२५ वाजता या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 13/Jun/2025














