रत्नागिरी : शहरातील ८० फुटी रस्त्यावरील भूते नाका ते किल्ला या भागातील पथदीप बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांना काळोखातूनच जाताना अडचणीचे होत आहे. या दुपदरी मार्गावर पूर्वी शेती होती.
त्यामुळे या दोन्ही बाजूंना ओलावा असतो. त्यामुळे या भागात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढल्यानेत्यांची भीती निर्माण झाली आहे. तसेच या मार्गावर मोकाट जनावरेही ठाण मांडून बसलेली असतात. अंधारात ती दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 13/Jun/2025














