Maharashtra Rain : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. अनेक भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. तर काही भागात तुरळक पाऊस सुरु आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
दरम्यान, अशातच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामानाबाबतचा नवीन अंदाज वर्तवला आहे. राज्यात 20 जून पर्यंत भाग बदलत पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.
कुठं कुठं कधी पडणार पाऊस?
राज्यात 13, 14, 15 जून दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण खूप पाऊस पडणार आहे. पण हा पाऊस पडत असताना 13, 14 जून ला विदर्भात देखील देखील पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ 12, 13, 14 जूनला तुमच्या इकडे देखील पाऊस पडणार आहे. पण तुमच्या इकडे मात्र 15 जून पासून ते 20 जून च्या दरम्यान तुमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. या पावसामध्ये विजेच प्रमाण जास्त आहे वारं खूप आहे. म्हणून स्वतःची काळजी घ्यावी. कारण की वाऱ्याच प्रमाण जास्त आहे आणि झाडाखाली आपले जनावर बांधू नका कारण की वार जास्त असल्यामुळे झाड पडण्याची भीती आहे असे पंजाबराव डख म्हणाले.
ज्यांच्या जमिनीमध्ये पुरेशी ओल ते पेरणी करु शकतात
ज्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही पेरण्याची तयारी करू शकता. ज्यांना मका लागवड करायची तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या कारण की राज्यामध्ये 20 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भावात पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
राज्याच्या विविध भागात जोराचा पाऊस पडणार
पंजाबराव डखांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात जोराचा पाऊस पडणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर, नगर या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडणार आहे. 13 जून ते 18 जून च्या दरम्यान लातूर, नांदेड, बीड, धाराशीव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, जालना, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, पारगुळा तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम, यवतमाळ सांगायचं झालं तर सर्व जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्.यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:01 13-06-2025














