रत्नागिरी : पुनस (ता. लांजा) येथे बिबट्याच्या बछड्याची आईशी पुनर्भेटीसाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये दोन वेळा बिबट्या मादी त्याच्याजवळ येऊन गेल्याचे कॅमेऱ्यामध्ये संकलित झाले आहे. परंतु, बछड्याला न नेल्याने साताऱ्याचे डॉक्टर निखिल बनगर यांच्या निगराणीखाली त्याला सुस्थितीत ठेवण्याचे उपाय सुरू आहेत.
वातावरणातील बदलामुळे व पाऊस असल्याने व बिबट्यावर डॉक्टरांचे लक्ष कॅमेऱ्यांची मदत बछड्याच्या आरोग्याला धोका पोहोचू नये, यासाठी त्याची आईची पुनर्भेटी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी कळविले आहे. पुनस येथे ८ जुनला संसारी तिठानजीक डांबरी रस्त्यावरती बिबट्याचा बछडा आढळून आला.
याची माहिती मिळताच तत्काळ वन विभागाचे अधिकारी वनपाल लांजा वनरक्षक लांजा वनरक्षक कोरले घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरीजा देसाई, साहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी प्रियांका लगड यांना या घटनेची माहिती दिली. बिबट्याच्या बछड्याची आणि त्याच्या आईची भेट झाली नाही. ९ जूनला वन अधिकारी रत्नागिरी यांच्या सूचनेनुसार सातारा येथील वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर व सह्याद्री व्याघ्र यांना पाचारण केले. पुनर्भेट होण्याकरता अनुकूल जागा निवडण्यात आली. तिथे ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला. परंतु, बछड्याची पुनर्भेट झाली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 14/Jun/2025














