रत्नागिरी : नगर परिषद प्रभाग कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गट व गणांच्या प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुका चार महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करायच्या असल्याचे आदेश राज्याचे सहसचिव व. मुं. भरोसे यांनी काढले आहेत.
राज्यातील 6 मे 25 पयर्र्त राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समितींचा कालावधी पूर्ण झाला असून, यांच्या निवडणुका चार महिन्यांच्या विहीत कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. 32 जिल्हा परिषदेंचे गट आणि 336 पंचायत समित्यांची गण संख्या आणि प्रभाग रचना निश्चित केली जाणार आहे.
जिल्हाधिकार्यांनी 14 जुलैपर्यंत प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द करायची आहे. 21 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करायच्या आहेत. 28 जुलैपर्यंत जिल्हाधिकार्यांनी प्राप्त हरकतींच्या आधारे विभागीय आयुक्तांना अभिप्रायासह प्रस्ताव सादर करायचा आहे. 11 ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांनी प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय घ्यायचा आहे. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी 18 ऑगस्टपयर्र्त अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्याकडे सादर करायचे आहे.
हा कार्यक्रम तयार करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी प्रभाग रचना अधिकार्यांची नियुक्ती करुन प्रभाग रचना कार्यक्रम आणि वेळापत्रक विहीत मुदतीत जाहीर करायचे असल्याचे सह सचिव यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. ऑगस्टपर्यंत प्रभाग रचना जाहीर होणार असल्याने दिवाळीपर्यंत निवडणुकांचे फटाके फुटणार असून, गणपतीपासूनच खर्या अर्थाने प्रचाराला वेग येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 14-06-2025














