आरवली : शिल्लक रेशन धान्यापासून वंचित रेशन कार्डधारकांना द्या, अशी मागणी आता करण्यात येत आहे. यासंदर्भात आपण अन्न पुरवठामंत्री ना. छगन भुजबळ यांना आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून निवेदन देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला आहे.
केवायसी प्रणालीमुळे धान्य काळाबाजार होण्यास आळा बसला हे जरी खरे असले तरी अनेक गरजू कुटुंबांना अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ मिळत नाही, ही वस्तुस्थिती संपूर्ण जिल्ह्यात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ‘प्राधान्य कुटुंब लाभार्थी’ यांनाच रास्त दराचे धान्य देण्यात येते. यासाठी प्रत्येक गावासाठी वेगवेगळे उत्पन्न ठरवण्यात आले असून या उत्पन्नाच्या आतील लाभार्थ्यांनाच धान्य वितरण करण्यात येते. सर्वांच्या पोटाची भूक एकच असताना उत्पन्नाची अट आणि तीही प्रत्येक गावासाठी वेगवेगळी कशासाठी, असा प्रश्न जाकीर शेकासन यांनी उपस्थित केला व रत्नागिरी जिल्ह्यात अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 14/Jun/2025














