दापोलीत सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

दापोली : दापोली येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल, १३ जून २०२५ रोजी दुपारी १२.०२ वाजता दापोली ते हर्णे मार्गावरील उपजिल्हा रुग्णालयासमोर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविकांत रमेश जाधव (वय ४३, रा. काळकाईकोंड, दापोली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जाधव यांनी आपली गाडी दापोली ते हर्णेकडे जाणाऱ्या रस्त्यावर, उपजिल्हा रुग्णालयाच्या अगदी समोर, अशा पद्धतीने उभी केली होती की, त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होऊन धोका निर्माण होऊ शकेल. आपली गाडी तिथेच सोडून ते कोठेतरी निघून गेले होते.

या घटनेची माहिती मिळताच, दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक प्रवीण कैलास क्षीरसागर (वय ३६, पो. कॉ./१६१७) यांनी फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार, १३ जून २०२५ रोजी दुपारी ३.१५ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला असून, याचा गुन्हा रजिस्टर नंबर ११३/२०२ भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८५ नुसार, सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण करणे हा दंडनीय गुन्हा आहे. या प्रकरणी दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत. अशा घटनांमुळे केवळ वाहतुकीलाच अडथळा होत नाही, तर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो, असे मत पोलिसांनी व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 14-06-2025