राजापूर : रस्त्याची अन् शाळेची संरक्षक भिंत कोसळली

राजापूर : चार दिवारांच्या विश्रांतीनंतर पावसाने काल दुपारनंतर धुमाकूळ घातला. कालच्या पावसामध्ये सागवे येथील ठुकरूलवाडीकडे जाणारी रस्त्याची भिंत आणि सागवे जांभारी शाळेची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले आहे तर, तारळ येथे रस्त्याचा काही भाग वाहून गेला.

हवामानखात्याकडून, गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाच्या अनुषंगाने यलो अलर्टचा इशारा देण्यात आला होता, त्याप्रमाणे पावसाने काल तालुक्यामध्ये धुमाकूळ घातला, चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेला पाऊस सकाळच्या सत्रामध्ये सरीवर सरी कोसळत होता; मात्र, दुपारनंतर पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये तालुक्यातून अर्जुना कोदवली नदीच्या पाण्यामध्येही वाढ झाली होती दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने रात्री उशिरा मात्र विश्रांती घेतली.

त्यानंतर, हवामानखात्याने आज पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये यलो अलर्टचा इशारा दिला आहे; मात्र, दिवसभर तालुक्यामध्ये पावसाचा फारसा जोर नाहता, दरम्यान, काल पडलेल्या पावसामध्ये सागवे येथील ठुकरूलवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची भिंत आणि सागवे जांभारी शाळेची संरक्षक भिंत कोसळून नुकसान झाले आहे. तर तारळ येथे रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याची घटरा घड़ती आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 14/Jun/2025