रत्नागिरी : शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश अर्ज भरण्यास १६ जूनपर्यंत अंतिम मुदत

रत्नागिरी : दहावीनंतरच्या तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेश प्रक्रिया नोंदणी २० मे पासून सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १६ जून आहे. ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी http:/poly25.dtemaharshtra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.

ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती साठी मुदत १६ जून २०२५ पर्यंत आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी १८ जून २०२५ रोजी प्रकाशित होईल, तर गुणवत्ता यादीवरील आक्षेप १९ ते २१ जून २०२५ पर्यंत नोंदविता येतील. अंतिम गुणवत्ता यादी २३ जून रोजी प्रकाशित करण्यात येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 14/Jun/2025