शिवणे शाळा नं. १ शाळेसाठी अखेर नवीन वर्गखोली मंजूर

साडवली : शिवणे शाळा नं. १ शाळेला नवीन वर्गखोली मिळावी यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी बुधवारपासून देवरूख तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला यश मिळाले आहे. आमदार शेखर निकम यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून शाळा वर्गखोली व अपूर्ण राहिलेला रस्ता यासाठी मंजुरी मिळाली आहे. यामुळे सरपंच राजू पवार व ग्रामस्थांनी गुरुवारी उपोषण स्थगित केले.

या वेळी माजी आमदार रवींद्र माने, युवासेना सचिव प्रद्युन्न माने, तालुकाध्यक्ष बंड्या बोरूकर. तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आमदार शेखर निकम यांनी रवींद्र माने यांच्याशी चर्चा केली. मयूरबाग ते नांदळज या रस्त्यावर सध्या जिल्हा परिषद बांधकाम विभाग तात्पुरती डागडुजी करणार आहे. शाळेचा प्रश्न शिक्षण विभाग सोडवणार आहे. या उपोषणाला सर्वपक्षीय पदाधिकारी पाठिंबा दिला होता. सुरेश बने, छोट्या गवाणकर, युयुत्सू आर्ते, गीते गुरुजी, भाऊ कांगणे आदींनी भेटी दिल्या. शाळा व रस्ता यांचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 14/Jun/2025