चिपळूण : पेठमाप-मुरादपूर उड्डाणपूलजवळील सेवारस्त्यावर गेल्या काही या दिवसांपासून एकेक फुटाचे खड्डे पडले होते. यामुळे पेठमाप, मुरादपूरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. हा रस्ता अक्षरशः धोकादायक झाला होता.
या समस्येकडे लक्ष वेधून घेऊन शिवसेना उपशहरप्रमुख विकी लवेकर यांनी काल थेट रस्त्यावर उभं राहून खासगी डंपरचालकांना थांबवत रोडवर भराव टाकण्याचे काम करून घेतले. चिपळूण नगर पालिकेच्या जेसीबीच्या मदतीने खड्ड्यांमध्ये गाळ पसरवण्यात आला. या वेळी सतीश सावंत यांचेही विशेष सहकार्य लाभले.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली होती की, अपघाताची भीती वाटत होती; पण आजचे काम पाहून दिलासा वाटतो. लवेकर यांनी सांगितले, ‘पुढील दोन दिवसांत पेटमाप-भाटण ते फरशी ब्रिज डीपी रोडवरील खड्डेही बुजवण्यात येणार आहेत.’ या तातडीच्या कृतीबद्दल पेठमाप आणि मुरादपूर ग्रामस्थांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि हे खरे जनसेवेचे उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 14/Jun/2025














