दापोली : वेळवी दळखण, आंजर्ले एसटी बस सुरू होण्यासाठी आगार व्यवस्थापकांना निवेदन

दापोली : वेळवी दळखण, आंजर्ले एसटी नियमित सुरू करण्यासाठी येथील आगार व्यवस्थापक मुनाफ राजापकर यांना निवेदन देण्यात आले आहे. ही गाडी बंद असल्यामुळे यावर अवलंबून असलेले विद्यार्थी तसेच परिसरातील ग्रामस्थ यांची गैरसोय होत आहे.

त्यामुळे या मार्गावरील एसटीची सेवा सुरू करावी, या मागणीचे निवेदन शिंदेसेना आणि देहेण ग्रामपंचायतने आगार व्यवस्थापकांना दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 14/Jun/2025