साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, भंडारवाडी, तिठा ते साखरपा बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर आमदार किरण सामंत यांचे याकडे लक्ष वेधले असता त्यांच्या आदेशानंतर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले.
साखरपा, भंडारवाडी, तिठा ते साखरपा बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्यावरून जाताना वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली होती.
तसेच रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. अखेर या कामाकडे आमदार किरण सामंत यांचे लक्ष वेधले असता त्यांनी रस्त्याचे डांबरीकरण करुन रस्ता वाहतूक योग्य केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 14/Jun/2025














