संगमेश्वर : परतीच्या पावसाचा जोर असला तरीही शेतकरी भात कापणीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील गावांमध्ये सर्प, विंचूदंशाच्या घटना वाढलेल्या आहेत. मागील तीन महिन्यांत जवळपास १०० जणांना सर्पदंश, विंचूदंश व अन्य प्राण्यांनी चावा घेतल्याच्या घटनांची ग्रामीण रुग्णालयात नोंद झाली आहे.
संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो. पावसावर अवलंबून असणारी भातशेती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केली जाते पाराशेती तसेच वायंगणी शेतीच्या बरणी, कापणीच्या वेळी संगमेश्वर परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांना सवर्वाधिक सर्प, विंचूदंश झाल्याचे निदर्शनास येत आहे. भात कापणी, भात पेरणीवेळी सर्वसाधारण मे ते जून दरम्यान आणि सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक सर्पदंश झाले आहेत. त्यामध्ये विंचूपेक्षा सर्पदंशाचे प्रमाण सर्वाधिक आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात १५, मे महिन्यात ८. जून महिन्यात २०, जुलै १४ तर ऑगस्ट महिन्यात १५ जर्णांना सर्पदंश झाला
आहे. पाच महिन्यात ७२ जणांना सर्पदंश झालेला आहे. तसेच पाच महिन्यात ४९ जणांना विचूदंश झाला. त्यात एप्रिलमध्ये ९, मे महिन्यात १५, जून मध्ये १४, जुलै महिन्यात ३. ऑगस्ट महिन्यात ८ जणांचा समावेश आहे. तसेच एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान श्वानदंशाचे ३८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते.
रुग्णालयात पुरेसा औषधसाठा
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांना उपचार करुन घरी सोडण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले. तसेच विविध सर्पदंश आणि विंचू दंशावर पुरेसा औषध साठा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्पदंश आणि विंचू दंशाचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 14/Oct/2024









