रत्नागिरी : डाक विभागात विमा योजनेसाठी थेट एजंट भरती

रत्नागिरी : डाक विभागात टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट एजंटच्या भरतीकरिता मुलाखती घेण्यात येत आहेत.

भरतीविषयी अधिक माहितीसाठी अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग अथवा सचिन तोडणकर (९४२३०५००६२) किंवा गजानन करमरकर (९४२२०१०९३०) यांच्याशी संपर्क साधावा किंवा www.maharashtrapost.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन डाकघर अधीक्षकांनी केले आहे.

इच्छुक उमेदवारांनी 23 व 24 जून 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग, व प्रधान डाकघर चिपळूण प्रधान कार्यालय, चिपळूण येथे मुलाखतीसाठी हजर राहावे. सोबत बायोडाटा, प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास) घेऊन येणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:52 14-06-2025