खेड : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत रविवार, ४ मे २०२५ रोजी घेण्यात आलेल्या NEET प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत जिल्ह्याचे आणि कोकण विभागाचे नाव उंचावले आहे. विशेषतः कु. राहिल मुजावर (देशात २०७७ वा क्रमांक) आणि कु. वरद थोरात (देशात २०६५ वा क्रमांक) यांनी ७२० पैकी ५७१ गुण (९९.७६ पर्सेंटाईल) मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
यावर्षी NEET परीक्षेची काठिण्य पातळी खूपच जास्त होती, ज्यामुळे देशभरात केवळ ५० ते ६० विद्यार्थ्यांना ६५० पेक्षा अधिक गुण मिळवता आले. अशा परिस्थितीतही, रोटरी स्कूलच्या १५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एम्स, केईएम, ग्रँट मेडिकल, सायन हॉस्पिटल, बी.जे. मेडिकल, ए.एफ.एम.सी. यांसारख्या नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्रता मिळवून आपला प्रवेश निश्चित केला आहे. संपूर्ण कोकण विभागात NEET परीक्षेत इतके दैदिप्यमान यश मिळवणारी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल ही एकमेव शाळा ठरली आहे.
शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांची यादी:
- कु. राहिल मुजावर व कु. वरद थोरात: ५७१ गुण (९९.७६ पर्सेंटाईल)
- कु. स्वरांगी मोरे: ५५४ गुण (९९.५१ पर्सेंटाईल)
- कु. सोनम महाले: ५३८ गुण (९९.१५ पर्सेंटाईल)
- कु. मुक्ता गोखले: ५३१ गुण (९८.८३ पर्सेंटाईल)
- कु. यश माळी: ५२६ गुण (९८.७६ पर्सेंटाईल)
- कु. सृष्टी भोजने: ५११ गुण (९८.१५ पर्सेंटाईल)
- कु. पियुष घुगरे: ५०८ गुण (९८.०१ पर्सेंटाईल)
- कु. तन्वी जैन: ४९८ गुण (९७.५१ पर्सेंटाईल)
या सर्व विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण मिळवून शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल रोटरी स्कूल आणि विद्यार्थ्यांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांच्या शिक्षकांसह, वर्गशिक्षक आणि परीक्षा विभागाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमीता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.














