कडवई : संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीतर्फे १५ वा वित्तआयोग ग्रामपंचायत फंडाच्या माध्यमातून प्रत्येक घरपट्टीधारकाला प्लास्टिक कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच विशाखा कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे, माजी सरपंच संदेश सागवेकर, ग्रामपंचायत कर्मचारी अनंत चोपडे, अमित साळुंके, नीलेश तुळसणकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच दत्ताराम ओकटे यांनी सांगितले की, लवकरच घंटागाडीद्वारे कचरा संकलन करून डंपिंग ग्राउंडला आणण्याची सुरुवात केली जाईल. तिथे सिग्रेशन शेड तयार करून कपोस्ट पिट तयार करण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे बचत गटांच्या महिलांना रोजगार निर्मिती होईल व त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 16/Jun/2025














