संगमेश्वर तालुक्यात ९९९ विद्यार्थी पहिलीत होणार दाखल

देवरुख : नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात १६ जून पासुन होणार असून जिल्हा परिषदेच्या शाळा गजबजणार आहेत. यात पहिल्याच दिवशी ९९९ विद्यार्थी पहिलीसाठी प्रवेश करणार आहेत. संगमेश्वर तालुक्यातील शाळांचे व्यवस्थापन पूर्ण झाले आहे. सोमवारी नवागतांचे स्वागत वाजंत्री वाजवून दिंडी तसेच प्रभातफेरी काढून होणार आहे. यावर्षी पहिलीला ९९९ मुले दाखल होणार आहेत.

या लहान मुलांचे शाळेत पहिले पाउल पडणार आहे. हे पाउल रंगाच्या माध्यमातून कागदावर उमटवले जाणार आहे. पालक हे जतन करुन ठेवणार आहेत. हा नवा उपक्रम तालुक्यात राबवला जाणार आहे. शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके व बूट यांचे पहिल्याच दिवशी वितरण होणार आहे. हे सर्व साहित्य उपलब्ध झाले आहे. पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी, कार्यक्षेत्र अधिकारी शाळेत उपस्थित राहणार आहेत. पोषण आहाराबरोबरच मुलांना खाउचे वाटप होणार आहे. शालोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेतुन गर्दी झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 16/Jun/2025