रत्नागिरी : केंद्र सरकारतर्फे देशातील आदिम बांधवांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ संपूर्ण देशभरात राववण्यात येत आहे. जिल्ह्यात १६ जूनपासून अभियानाला प्रारंभ होईल. हे अभियान मंडणगड वाल्मिकीनगर ग्रामपंचायता कार्यक्षेत्रात आदिवासी समाजासाठी राबवण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा वाल्मिकीनगर येथे २० व २५ जून रोजी सकाळी १० ते सायं ६ या कालावधीत शिबिर होणार आहे. मंडणगडातील वाल्मिकीनगर मधील आदिवासी लाभार्थिनी योजनेचा लाभघेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले आहे.
हे अभियान प्रधानमंत्री आदिवासी न्याय महा अभियायान (पीएम जनमन) धर्तीवर आहे. गावपातळीवर थेट शिबिरे आयोजित करुन विविध शासकीय योजनांचे लाभ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
अभियान अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुकास्तरीय समित्या स्थापन केल्या आहेत. जिल्हास्तर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व सह अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वैदेही रानडे आहेत. प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग पेण हे सदस्य सचिव् म्हणून कामकाज पाहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 16/Jun/2025














