रत्नागिरी : रत्नागिरी येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे यांची जळगाव बदली झाली असून त्यांच्या जागी अतिरिक्त पदभार म्हणून रायगडचे नितीन मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोहिते हे १६ जून रोजी सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरीच्या अन्न व औषध प्रशासन विभागात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या दीनानाथ शिंदे यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विविध दुकानांना ऑनलाईनप्रमाणे परवाने देण्यात आले. पूर्वी ३५०० हजार परवाने देण्यात आले होते.
परवान्यासाठी किचकट प्रक्रिया होती आहे. मात्र शिंदे यांची नियुक्ती झाल्यानंतर तब्बल १६ हजार ७०० दुकानाना परवाने दिली आहेत. काजू, आंबा यासह विविध हॉटेल व्यवसायात योग्य समन्यवय साधून त्यांनी कामकाज पाहिले.
तसेच ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई मिळावी म्हणून पथकामार्फत मिठाई दुकानांची तपासणी करण्यात येत होती. अतिरिक्तसह विविध पदांची आवश्यकता होती. त्यामुळे शिंदे यांनी पुणे येथील अन्न व औषध प्रशासन विभागात पाठपुरावा करून तब्बल चार नवीन अन्न अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. पुरेसे मनुष्यबळ असल्यामुळे अन्न व औषध विभागात आता योग्य सुसूत्रता येईल असेही सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात सहायक आयुक्त म्हणून काम करताना खूप छान अनुभव होता. सर्वांशी संवाद साधून कामकाज पाहिले. रत्नागिरीकरांनी, हॉटेल व्यावसायिक, पत्रकार बांधव यांनीही चांगली साथ दिली. माझ्या कार्यकाळात नवीन पदे भरली, परवाना काढताना ऑफलाईनऐवजी ऑनलाईन पध्दतीने काढून दिले – दीनानाथ शिंदे, सहायक आयुक्त, अन्न व औषध अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 16/Jun/2025














