खेड : तालुक्यात पावसामुळे संततधार अनेकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात गेल्या चोवीस तासांत ४८.५७ मिमी एवढी पावसाची नोंद झाली आहे. अशातच खेड तालुक्यातील तळे गावातील उधळवाडी येथे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. शुभांगी राजाराम कोलम या ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या घरावर वीज कोसळून संपूर्ण घरातील वीज जोडणी जळून खाक झाली.
ही घटना घडली तेव्हा शुभांगीबाई घरात होत्या. वीज कोसळताच ती विद्युत वाहिनीतून घरात प्रवेशली आणि संपूर्ण इलेक्ट्रीक उपकरणे व वायरिंग जळून गेली. विजेच्या प्रवाहामुळे शौचालयाच्या भिंतीला तडे गेले आणि जमिनीला मोठी भेग पडली. या घटनेत शुभांगी यांचा जीव थोडक्यात बचावला असला तरी त्यांच्या पाठीवर मुका मार बसल आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे य घटनेनंतर चोवीस तास उलटून गेले तरी आपत्ती नियंत्रण यंत्रणेकडून कोणत्याहीप्रकारची मदत पोहोचलेली नाही. मुसळधार पावसात कोलम कुटुंबियांनी अंधारात दिवस काढावे लागत आहेत. हवामान विभागाने कोकणासाठी रेड अलर्ट जारी केल असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीयुक्त वातावरण पसरले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 16/Jun/2025














