चिपळूण : चिपळूण तालुक्यामध्ये एकूण २२ हजार ६३५ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे. यापैकी १९ हजार १९४ शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक काढला आहे. यामुळे उर्वरित ३ हजार ४४१ शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. नोंदणी केल्याशिवाय पीएम किसान, पीकविमा, आपत्ती नुकसानभरपाई यांसारख्या योजना मिळणार नाही, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी दिली.
शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या सरकारी योजनांचा लाभघेण्यासाठी आता ‘अॅग्रीस्टॅक’ नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. अॅग्रीस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, नमो किसान योजना, पीकविमा लाभ मिळणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 16/Jun/2025














