पावस : पावस बसस्थानकातील शौचालयाची टाकी भरल्याने पावसाळ्यामध्ये त्याचे पाणी बसस्थानक परिसरामध्ये येत असल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रोगराई वाढण्याची शक्यता असल्याने तातडीने शौचालयाची टाकी साफ करण्यात यावी, अशी मागणी प्रवासीवर्गाने केली आहे.
पावस बसस्थानकामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत २ लाख ६७हजार रुपये खर्च करून शौचालय बांधण्यात आले आहे; परंतु शौचालय वारंवार भरत असल्यामुळे परिवहन खात्यातर्फे साफ केले जात होते. वारंवार साफ करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शौचालयाला सध्या टाळे ठोकण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी जनतेची गैरसोय होत आहे.
सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे या शौचालयाच्या टाकीतील दुर्गंधीयुक्त पाणी बसस्थानक परिसरामध्ये वाहत आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरामध्ये फिरत असणाऱ्या प्रवासी जनतेला त्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जवळच्या दुकानदार व हॉटेल व्यावसायिकाला त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी तातडीने उपयोजना करणे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 16/Jun/2025














