‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा प्रेक्षकांचा आवडता शो. गेली अनेक वर्ष हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. हास्यजत्रेचे विनोदवीर उत्तम अभिनय आणि विनोदशैलीने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात.

या शोमधील कलाकारांनी लोकांचं प्रेम मिळवलंय. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या कार्यक्रमाचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आवडता कार्यक्रम परतत असल्याने चाहते खुश झाले आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ येत्या २ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये कॉमेडी क्विन वनिता खरात, इशा, नम्रता, प्रसाद आणि समीर चौगुले यांचे पात्र पाहायला मिळत आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हास्याची गुगली टाकून विनोदांनी क्लीनबोल्ड करायला पुन्हा घेऊन येत आहोत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’! पाहूया, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ – कॉमेडीची हॅटट्रीक! २ डिसेंबरपासून, सोम.- बुध., रात्री ९.३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत चाहत्यांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केलाय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:39 14-10-2024