सावर्डे : सावर्डे खोतवाडी (ता. चिपळूण) येथील लघु पाटबंधार योजनेंतर्गत धरणाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. धरणाची लांबी ५४० मीटर, तर उंची ३२ मीटर असून या धरणातील पाण्यामुळे २१३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. हे घरण कापशी नदीच्या उगमापाशी बाघले जाणार आहे.
खोतवाडी येथील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि दरवर्षी उन्हाळ्यात भासणाऱ्या तीव्र पाणीटंचाईमुळे या परिसरात धरण होणे अत्यंत गरजेचे होते. या प्रकल्पाची दीर्घकाळापासून सावर्डेवासीयांची मागणी होत होती. या धरणामुळे चाळीस गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. आमदार निकम यांनी शासनस्तरावर सातत्याने या योजनेचा पाठपुरावा केला. त्यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे विशेष मागणी करून धरणासाठी ८४ कोटी ७७ लाख ९५ हजार ६०५ रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. आमदार निकम यांनी सावर्डेसाठी २२ कोटी रुपयाची जनजीवन मिशन योजना मंजूर करुन आणली आहे. या योजनेच्या भूमिपूजनानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या योजनेमुळे पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी सभापती पूजाताई निकम, सरपंच समिक्षा बागवे, उपसरपंच जमिर मुल्लाजी, तंटामुक्ती अध्यक्ष बाबूशेठ चव्हाण, माजी सरपंच बाळूशेठ मोहिरे, उद्योजक पिंट्याशेठ पाकळे, केतनशेठ पवार, बंधूशेठ पाकळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शौकतभाई माखजनकर, माजी सरपंच शांतारामशेठ बागवे, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष समीर काझी, नूतन सेवा संघ सावर्डे खोतवाडी अध्यक्ष निलेश चव्हाण, मुंबई अध्यक्ष रघुनाथराव चव्हाण, मञ्जिद मुल्लाजी, आदी पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 14/Oct/2024









