कोकण रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू

रत्नागिरी, १६ जून २०२५ : कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांसाठी १५ जून २०२५ पासून ते २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांना या बदलांची माहिती मिळवण्यासाठी दोन पर्याय दिले आहेत.

प्रवाशांनी भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाइट NTES अर्थात enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊन किंवा ऑल इंडिया रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर संपर्क साधून आपल्या ट्रेनच्या वेळा तपासण्याची विनंती कोकण रेल्वे प्रशासनाने केली आहे.

पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर भूस्खलन किंवा इतर नैसर्गिक आपत्त्यांची शक्यता असते. अशा वेळी सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हे विशेष वेळापत्रक लागू केले जाते. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे आणि वेळेवर माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 16-06-2025