दापोली, १६ जून २०२५ : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न शाखा ता. दापोली (ग्रामीण) बोरिवली गटाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रविवार, १५ जून रोजी बोरिवली गटातील विविध गावांमध्ये भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बोरिवली, पंचनदी, आघारी, दुमदेव, मळे, चिखलगाव, देवके या गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी वड, पिंपळ, बाभूळ अशा विविध प्रकारच्या झाडांची रोपे लावण्यात आली. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ पर्यावरणाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात गटाचे अध्यक्ष संजय गोरीवले, सचिव महेंद्र रेवाळे, उपाध्यक्ष शांताराम उसरे, अनिल रेवाळे, अमित नाचरे, सहसचिव रूपेश कुटरेकर, सदस्य जितेश पदुकले, सल्लागार डॉ. सुनिल गोरिवले, दिनेश आडविलकर यांचा समावेश होता. तसेच, या कार्यक्रमाला दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनीही उपस्थिती लावली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गावांतील ग्रामस्थ आणि महिला मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि पर्यावरण रक्षणाचा एक महत्त्वपूर्ण संदेश समाजात पोहोचला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 16-06-2025














