रत्नागिरी : आरोग्य मंदिर येथे रिक्षा-दुचाकीचा भीषण अपघात; 6 जण जखमी

रत्नागिरी : शहरात रविवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास आरोग्य मंदिर येथे रिक्षा आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकूण 6 जण जखमी झाले. जखमींमध्ये रिक्षातील चार प्रवासी आणि दुचाकीवरील दोघांचा समावेश आहे. अपघातानंतर तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात रिक्षाचालक अजित अरविंद वाडकर (53, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी), विनोद शंकर धनावडे (रा. वाटद खंडाळा, ता. रत्नागिरी), तेजस विनोद धनावडे (12, रा. वाटद खंडाळा, ता. रत्नागिरी) आणि कार्तिक किरण घेवडे (18, रा. फुणगूस, संगमेश्वर) हे रिक्षातील जखमी झाले आहेत. तर दुचाकीवरील अजमल खालिद मजगांवकर (19, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) आणि सलमान सुलेमान दर्वे (18, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) हे दोघे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवले. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 16/Jun/2025