गुहागर : तळवली हायस्कूलमध्ये चोरी

गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या तळवली येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी येथील अडगळीच्या खोलीतील जुने नादुरुस्त असलेले ८ संगणक संच चोरुन नेल्याचे निदर्शनात आले आहे. यामध्ये ८ मॉनिटर, ८ सीपीयू, ६ यूपीएस बॅटरी त्याचबरोबर मैदानात इमारतीसाठीचे ठेवलेले स्टीलदेखील चोरीला गेल्याचे निदर्शनात आले आहे.

ही चोरी ही ७ व ८ जून रोजी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याविषयी शाळेचे मुख्याध्यापक यांनी तत्काळ गुहागर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. चोरीची घटना कळताच गुहागरचे पोलीस निरीक्षक स्वतः तातडीने प्रशालेत पोहोचले व त्यांनी या ठिकाणी पाहणी केली. या घटनेतील चोरांना पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हानच आहे. प्रशालेतील एका अडगळीच्या खोलीमध्ये हे सर्व संगणक संच ठेवलेले होते. ४ सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही एकाही कॅमेरामध्ये चोर दिसून आले नाहीत. यामुळे चोरांना येथील पूर्ण माहिती असावी, असा अंदाज आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 16/Jun/2025