लांजात २१, २३, २४ रोजी येणार अत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅन

लांजा : कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागामार्फत उपक्रम राबविण्यात येत असून लांजा तालुक्यात २१, २३ व २४ जून असे तीन दिवस अत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅन येणार असून या उपक्रमाचा लाभघेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

ग्रामीण, दुर्गम भागातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे वेळेवर निदान होऊन अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होईल. या व्हॅनमध्ये तपासणी करताना स्तनाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग व गर्भाशय मुखाचा कर्करोग यावर अधिक भर असणार आहे.

या व्हॅनसोबत दंतशल्य चिकित्सक, रात्री रोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी अधिपरिचारिका, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशा कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायतीमार्फत व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

ही व्हॅन लांजा तालुक्यात २१ जून रोजी ग्रामीण रुग्णालय लांजा येथे, २३ जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र भांबेड व २४ जून रोजी प्रा. आ. केंद्र वाडीलिंबू येथे येणार आहे.

तरी नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभघ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश विटेकर व लांजा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार परगे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:47 PM 16/Jun/2025