खेड : तुंबाड गावामध्ये महाराजस्व अभियानांतर्गत शिबिर

खेड : तालुक्यातील तुंबाड गावात गुरुवारी शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन शासनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी खेड तालुक्यातील तुंबाड या गावी हे शिबिर झाले.

संपूर्ण पंचक्रोशीतील गावांमध्ये लोकांना विविध दाखले त्वरित मिळावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेकांनी उत्पन्नाच्या दाखल्याचा त्वरित लाभ घेतला. तसेच इतर अनेक शासनाच्या योजनांचा लाभ या शिबिरातून ग्रामस्थांना झाला. शिबिर यशस्वी करण्यासाठी खेडचे प्रांत शिवाजी जगताप, तसीलदार सुधीर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी राजाराम घुले, रजवेल सुजित गायकवाड, नवनाथ मोहिते, सवणसचे गंगाधर तांबे, श्रीधर पावसकर, तारका तांबे, तलाठी मुंडे, हिरालाल माळी, प्रभाकर सोनवणे आदींनी प्रयत्न केले. या शिबिरामध्ये नादगावचे अरफात कादीर, कोरेगावचे संदेश साळुंखे, जयश्री हुमणे आदींनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंदार आपटे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 16/Jun/2025