‘रत्नागिरी आठ’चे २०० टन बियाणे वितरित

दापोली : आतापर्यंत दापोली कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत तयार केलेल्या भाताच्या नवनवीन संशोधनात रत्नागिरी ‘आठ’ हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. या वर्षी कोकण कृषी विद्यापीठाने रत्नागिरी आठचे २०० टन बियाणे वितरित केले असून या विक्रीतून विद्यापीठाने २४ लाखाची उलाढाल केली आहे. कोकणातील पालघर ते सिंधुदुर्ग पर्यंत शेतकऱ्यांनी या वाणाला पसंती दर्शवली आहे.

त्यामुळे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पाच जिल्ह्यात या पिकाची लोकप्रियता वाढली आहे. कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत २०१८ आली रत्नागिरी शिरगाव या भात संशोधन केंद्रात हे वाण विकसित झाले. १३५ ते १३८ दिवसात तयार होणारे हे पीक मध्यम बारीक आणि चवीला दर्जेदार आहे.

त्यामुळे दरवर्षी या वाणाची मागणी वाढत आहे. तर महाबीज देखील कोकण कृषी विद्यापीठातुन या वाणाची उचल करत आहेत.

ना नफा ना तोटा या तत्वावर ६० रुपये प्रतिकिलो दराने विद्यापीठाने या वाणाची विक्री केली आहे. पाणथळी शेतीसाठी हे वाण वरदान असून वाणाची कमी उंची असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. दरवर्षी या भाताची गोडी शेतकऱ्यांना लागत असून अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा या वाणाची पेरणी करण्याकडे कल वाढत आहे.

त्यामुळे कृषी विद्यापीठाने या वाणाच्या उत्पन्न वाढीवर अधिक भर दिला आहे. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडीशा, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सहा राज्यांनी देखील या वाणाला पसंती दिली आहे. बदलत्या हवामानावर टिकून राहणाऱ्या या वाणात रोग प्रतिकारक्षमता अधिक आहे.

उत्पन्न क्षमता अधिक असल्याने कोकणात आणि अन्य राज्यात या वाणाची लोकप्रियता वाढली त्यामुळे दरवर्षी रत्नागिरी आठ या वाणाला मागणी वाढत आहे, तर दापोली कोकण कृषी विद्यापीठानेही शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता उत्पन्न वाढीवर भर दिला आहे- अरुण माने संचालक मध्यवर्ती संशोधन वाकवली

हळव्या जाती – (कालावधी १०५ ते ११५ दिवस)
रत्नागिरी २४, रत्नागिरी ७११, रत्नागिरी ७१, रत्नागिरी १, रत्नागिरी ५
निमगरव्या (१२० ते १२५)
रत्नागिरी ४, रत्नागिरी ६, रत्नागिरी ७
गरव्या (महान जात १४० ते १४५ दिवस) रत्नागिरी ३, रत्नागिरी २, रत्नागिरी ८

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 16/Jun/2025