रत्नागिरी : ‘कायाकल्प’मध्ये जिल्ह्यात रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र प्रथम

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूरने जिल्हास्तरीय प्राथमिक आरोग्य केंद्रस्तर प्रथम क्रमांक पुरस्कार पटकावला आहे. त्याला पुरस्कार रक्कम २ लाख जाहीर करण्यात आली आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या २०२४-२५ या वर्षातील कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागातर्फे करण्यात आली आहे. जिल्हा अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील १ ग्रामीण रुग्णालय, २९ प्राथमिक आरोग्य केंद्र, ११६ आरोग्य उपकेंद्र आणि १ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अशा एकूण १३७ आरोग्य संस्थांनी हा पुरस्कार पटकावला आहे. उर्वरित १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरस्कार रक्कम ५० हजार जाहीर झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे

प्राथमिक आरोग्य केंद्रस्तर पुरस्कार
चिपळूण तालुक्यातील रामपूर, कापरे, अडरे, खरवते. राजापूर तालुक्यातील धारतळे, सोलगाव. गुहागर तालुक्यातील कोळवली. दापोली तालुक्यातील पिसई, आसूद, उंबर्ले. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, बुरंबी, वांद्री. लांजा तालुक्यातील रिंगणे, साटवली, शिपोशी. रत्नागिरी तालुक्यातील वाटद, कोतवडे.

आरोग्य उपकेंद्र
दापोली तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र शिरखळला उपकेंद्र स्तर प्रथम क्रमांक पुरस्कार रक्कम १ लाख, तसेच उपकेंद्र माटवण व उपकेंद्र खेर्डी यांना समान गुणांमुळे प्रथम रनर अप असलेली पुरस्कार रक्कम ५० हजार विभागून जाहीर झाली आहे. उपकेंद्र पालगड द्वितीय रनर अप पुरस्कार रक्कम ३५ हजार.

प्रोत्साहनपर पुरस्कार
उर्वरित ११२ आरोग्य उपकेंद्रांना प्रोत्साहनपर पुरस्कार रक्कम २५ हजार जाहीर झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख ग्रामीण रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालय स्तर प्रोत्साहनपर पुरस्कार रक्कम १ लाख जाहीर झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 16/Jun/2025