Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये कधी देणार? गिरीश महाजन म्हणाले..

जळगाव : महायुती सरकारला राज्यात पुन्हा सत्तेत बसवण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे. महायुती सरकारनं जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना जुलै 2024 पासून 11 हप्त्यांची रक्कम 1500 रुपयांप्रमाणं मिळाली आहे. ( Ladki Bahin Yojana )

महायुतीच्या घटकपक्षांनी विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासंदर्भात गिरीश महाजन यांना जळगावमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. ( Ladki Bahin Yojana )

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजप नेत्यांकडून विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेतली जात आहे. जळगावात भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थित पत्रकार परिषद पार पडली. त्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना 2100 रुपये कधी देणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. ( Ladki Bahin Yojana )

गिरीश महाजन उत्तर देत म्हणाले की मला वाटत देश आता एवढा विकासाच्या मार्गानं चाललाय. नरेंद्र मोदींचा कार्यकाळ या वर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. सेवा, सुशासन, गरीब कल्याण या योजना किती वेगानं पुढे चाललेत हे बघा. लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये दिले, पूर्वी कुणी देत नव्हतं. ठीक आहे निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं 2100 रुपये देऊ, अजून वर्षही झालं नाही. सहा सात महिने झाले आहेत. आम्ही तेही देऊ, सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करेल. आर्थिक अडचण आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे. नियमितपणे पैसे लाडक्या बहिणींना मिळत आहेत. 1500 रुपये दिले नाही म्हटलं असं नाहीये. लाडक्या बहिणी आमच्यावर खूश आहेत, असं गिरीश महाजन म्हणाले. ( Ladki Bahin Yojana )

विरोधकांना फक्त तेवढाच शब्द आठवतो पण त्यांनी काय केलं, असा सवाल गिरीश महाजन यांनी केला आहे. विधानसभेला कधी नसेल इतक बहुमत आम्हाला मिळालं, असं गिरीश महाजन म्हणाले.

कर्जमाफीवर गिरीश महाजन काय म्हणाले?

कर्ज माफी सगळ्या गोष्टीवर इलाज आहे का,असा सवाल उपस्थित करत मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी कर्ज माफी बाबत वेळ लागत असला तरी पुढील काळात ती देण्या बाबत मुख्यमंत्री, उपमुख्य मंत्री सक्षम आहेत, वेळ लागत असला तरी ती दिली जाईल, असं म्हटलं. सरकारने नाकारले आहे असे नव्हे असे सांगत शेतकरी कर्ज माफी बाबत सरकारची भूमिका मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:18 16-06-2025