Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेवर सिनेमा येणार, गौतमी पाटील आणि अण्णा नाईक मुख्य भूमिकेत

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात सुरू केलेली ‘लाडकी बहीण’ योजना लोकप्रिय ठरली. या योजनेला राज्यातील महिलांकडून आणि लाडक्या भगिनींकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलेला सरकार दर महिन्याला दीड हजार रुपये देते.

आता या ‘लाडकी बहीण’ योजनेवर चक्क सिनेमा येणार आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून त्याचा मुहुर्तही नुकताच पार पडला आहे. ( Ladki Bahin Yojana )

‘लाडकी बहीण’ असंच या सिनेमाचं नावही असणार आहे. या सिनेमात रात्रीस खेळ चाले मालिकेतून घराघरात पोहोचले अण्णा नाईक म्हणजेच माधव अभ्यंकर आणि लावणी डान्सर गौतमी पाटील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर गणेश शिंदे सिनेमाचे दिग्दर्शक असतील. निर्मात्या शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे हे ओम साई सिने फिल्मच्या बॅनरखाली व शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘लाडकी बहीण’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. ‘लाडकी बहीण’ सिनेमाचा मुहुर्त क्लॅप हा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते देण्यात आला. ( Ladki Bahin Yojana )

या सिनेमात मोहन जोशी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, विजय पाटकर, अनिल नगरकर, सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, गौतमी पाटील, प्रिया बेर्डे, रुक्मिणी सुतार, भारत गणेशपुरे, जयवंत वाडकर, सारिका जाधव, जयश्री सोनवले अशी स्टारकास्ट आहे. गायक अवधूत गुप्ते तसेच आनंद शिंदे यांच्या आवाजात ‘लाडकी बहीण’मधील गाणी संगीतबद्ध करण्यात येणार आहेत. पंकज चव्हाण नृत्य दिग्दर्शक असून प्रशांत कबाडे, शिवाजी सावंत या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ( Ladki Bahin Yojana )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:25 16-06-2025