रत्नागिरी, दि. १६ जून : टाटा मोटर्सच्या पश्चिम विभागातील अग्रगण्य डीलर नेटवर्क असलेल्या एस.पी. ऑटोहबने चिपळूण येथे ‘ऑल न्यू टाटा अल्ट्रोज’ या नव्या कारचे शानदार अनावरण केले. शनिवार, १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता एस.पी. ऑटोहबच्या अत्याधुनिक टूल्स आणि इक्विपमेंट्सने परिपूर्ण वर्कशॉप आणि संपूर्ण वातानुकूलित शोरूममध्ये हा सोहळा पार पडला.
या अनावरण सोहळ्याला विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. बँक ऑफ इंडियाचे झोनल लीड श्री. शुभम सिन्हा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रियेश मालवीय आणि निलेश पाटील, आयडीबीआय बँकेचे अमोल पुजारी, तसेच इंडियन बँकेचे नाईकबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला.
नव्या अल्ट्रोजची वैशिष्ट्ये:
ऑल न्यू टाटा अल्ट्रोज ही अनेक आकर्षक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. यात नवीन थ्री-डी फ्रंट ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डीआरएल, फ्लश डोअर हँडल, इन्फिनिटी कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प्स, इल्युमिनेटेड लोगो असलेले स्मार्ट डिजिटल स्टिअरिंग व्हील, ३६० डिग्री कॅमेरा, १६’ ड्रॅग कट ॲलॉय व्हील्स आणि आकर्षक इंटीरियर यांचा समावेश आहे. ग्राहकांना टेस्ट ड्राईव्हचा अनुभव घेण्यासाठी खास गाडी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सुरक्षिततेला प्राधान्य:
टाटा मोटर्सची सर्व वाहने ग्लोबल एन कॅप अंतर्गत ४ स्टार आणि ५ स्टार सेफ्टी रेटिंगयुक्त आहेत. विशेष म्हणजे, केवळ टाटा वाहनांमध्ये ४ स्टार चाइल्ड सेफ्टी रेटिंग असल्याने, ही कार संपूर्ण कुटुंबासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे, ग्राहकांनी कार खरेदी करताना ग्लोबल एन कॅप रेटिंगबद्दल माहिती घेऊनच निर्णय घ्यावा, असे आवाहन टाटा मोटर्सने केले आहे.
आकर्षक फायनान्स सुविधा:
एस.पी. ऑटोहबने ग्राहकांसाठी १००% ऑन रोड फायनान्स, सर्वात कमी व्याजदर, ७ वर्षांपर्यंत कर्ज मुदत, तसेच शेतकरी बांधवांसाठी ७/१२ आणि ८अ उताऱ्यावर कर्ज सुविधा आणि सहामाही ईएमआय अशा अनेक आकर्षक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
एस.पी. ग्रुपने गोवा, गुजरात आणि राजस्थानमध्ये मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रवेश केला आहे. सिंधुदुर्ग ओरस येथील त्यांचे सर्वात मोठे वातानुकूलित शोरूम अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुशिक्षित सेल्स व सर्व्हिस स्टाफने परिपूर्ण असून ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज आहे.
टाटा कार श्रेणीअंतर्गत येणाऱ्या टियागो, टिगोर (पेट्रोल आणि सी.एन.जी.), नेक्सॉन (पेट्रोल आणि डिझेल), पंच आणि अल्ट्रोज ही सर्व वाहने येथे उपलब्ध आहेत.
“ग्राहकांनी अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या ओरस किंवा कणकवली शाखेशी संपर्क साधावा आणि टाटा कारच्या संपूर्ण स्वदेशी अभियानाचा अनुभव घ्यावा,” असे आवाहन अरुण देशपांडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:08 16-06-2025














