मोठी संधी! रेल्वेमध्ये 6180 तंत्रज्ञ पदांची भरती; 28 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू

मोठी संधी! रेल्वेमध्ये 6180 तंत्रज्ञ पदांची भरती; 28 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे! रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने RRB तंत्रज्ञ भरती 2025 ची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्या अंतर्गत देशभरात तब्बल 6180 तंत्रज्ञ पदांसाठी (Technician Grade III) अर्ज मागवण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेमध्ये स्थिर नोकरी मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवार https://www.rrbapply.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

पदाचे नाव: तंत्रज्ञ ग्रेड III पदसंख्या: 6180 जागा (तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल: 180, तंत्रज्ञ ग्रेड III: 6000) शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचणे अनिवार्य आहे.)

  • तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल: डिप्लोमा, B.Sc, BE/B.Tech
  • तंत्रज्ञ ग्रेड III: 10वी उत्तीर्ण, ITI, 12वी उत्तीर्ण

वयोमर्यादा:

  • तंत्रज्ञ ग्रेड I: 18 ते 30 वर्षे
  • तंत्रज्ञ ग्रेड III: 18 ते 30 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन निवड प्रक्रिया: संगणक आधारित चाचणी (CBT)

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 28 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2025

वेतनश्रेणी:

  • तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल: रु. 29,200/-
  • तंत्रज्ञ ग्रेड III: रु. 19,900/-

अधिकृत वेबसाईट: अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी https://rrbmumbai.gov.in/ किंवा https://www.rrbapply.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे भरती बोर्डाने केले आहे. अधिक तपशिलासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.