खेडमध्ये दुचाकी चोरी : सोनगाव घागवाडी येथील तरुणाची बाईक लंपास

खेड : खेड तालुक्यातील सोनगाव घागवाडी येथे एका अज्ञात चोरट्याने सुझुकी कंपनीची हायते ईपी मॉडेलची मोटारसायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही चोरी १४ जून २०२५ रोजी रात्री ११ ते १५ जून २०२५ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली.

अक्षय अरविंद घाग (वय २७, रा. सोनगाव घागवाडी, ता. खेड) यांनी या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या एम.एच. ०८ एके. ४१९८ क्रमांकाची लाल रंगाची सुझुकी हायते ईपी मोटारसायकल (किंमत अंदाजे २०,००० रुपये) अज्ञात चोरट्याने त्यांची संमती नसताना चोरून नेली आहे.

या घटनेची नोंद १६ जून २०२५ रोजी दुपारी २.३९ वाजता करण्यात आली असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.

या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी आपल्या वाहनांची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 17-06-2025