शिवनेत रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

साडवली : सलग पडणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर-देवरूख राज्य मार्गावर शिवने येथील मोरीजवळ एक जुनाट वड उन्मळून पडल्याने मार्ग बंद झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. १६) दुपारी दोनच्या सुमारास घडली. यामुळे संगमेश्वर-देवरूख मार्ग ठप्प झाला होता. मोठ्या गाड्यांची रांग दोन्ही बाजूला लागल्या होत्या.

छोट्या गाड्या करंबेळे आदर्शनगर थांबा येथून करंबेळे-कोसुंब शाळा ते पाताळीवाडी पुढे शिवने पिंपळस्टॉप अशी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू होती. याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बोरशे यांनी जेसीबी घटनास्थळी पाठवला व वडाचे झाड हटवले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर संगमेश्वर – देवरूख मार्गावरील वाहतूक सुरू झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 17/Jun/2025