रत्नागिरी : तालुक्यातील कापडगाव-कोठारेवाडी येथील प्रौढाला प्रेशरचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना उच्चदाबाचा जास्त त्रास झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दिपक बबन कांबळे (वय ५०, रा. कापडगाव, कोठारेवाडी (चरवेली सिमा), रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १५) सकाळी सातच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय पाली येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिपक कांबळे यांना प्रेशरचा जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल केले होते. मात्र त्यांना उच्च दाबाचा त्रास जास्त झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 17-06-2025














