पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) तब्बल तीन आठवड्याची विश्रांती घेतल्यानंतर पुढील प्रवास पुन्हा सुरू केला आहे. मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापून विदर्भाच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे.
पुढील दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यंदा मॉन्सून विक्रमी वेगाने आगमन करत २४ मे रोजी केरळसह कर्नाटक किनारपट्टीवर दाखल झाला. २५ मे मॉन्सूनने तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगडपर्यंत धडक दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 17-06-2025














