साखरपा येथील सावंत महाविद्यालयाचा विद्यार्थी विनायक भोसले युवा महाराष्ट्र केसरी पुरस्काराचा मानकरी

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील प्रा. आबा सावंत कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी विनायक भोसले याने राज्य स्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 20 24 मध्ये प्रथम क्रमांक पटकावून युवा महाराष्ट्र केसरी पुरस्काराचा मानकरी ठरला.

20वर्षा खालील 97 किलो खालील वजन गटात हि स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत 25 स्पर्धक सहभागी झाले होते. हि स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.

विनायक भोसले हा द्वितीय वर्ष कला शाखेमध्ये शिक्षण घेत आहे. विनायक भोसले ने बीड येथे आयोजित 17 वर्षाखालील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2019 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला, नागपूर येथे आयोजित 17 वर्षाखालील नॅशनल स्पर्धा 2019 मध्ये प्रथम क्रमांक, सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा मध्ये प्रथम, मुंबई विद्यापीठात इंटर झोनल कुस्ती स्पर्धेत द्वितीय, राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2024 मद्ये प्रथम पटकावून स्वतःचे व महाविद्यालयाचे नाव रोशन केले. त्याच्या यशामद्ये मार्गदर्शक म्हणून जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सूरज लिंगायत यांनी सहकार्य केले.

विनायक च्या यशाबद्दल संचालिका गीतांजली सावंत, उप प्राचार्या शिल्पा वैद्य, प्रा. प्रसाद झेपले, प्रा. हारगुडे, सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यथोचित सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:50 PM 14/Oct/2024