साडवली : गेली तीन ते चार दिवस संगमेश्वर तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. यामुळे तालुक्यातील निवेखुर्द बौद्धवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील मोरी खचली. या मोरीला एका बाजूला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे.
तसेच मुसळधार पावसामुळे या परिसरातील अनंत परब, नाना परब, विजया परब, काशीराम परब, संतोष जाधव, सदाशिव परब या शेतकऱ्यांच्या भात शेतात पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे. शेतात साचलेल्या पाण्यामुळे रुजून आलेली भात रोपे कुजण्याची भीती या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 17/Jun/2025














