MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!

मुंबई : राज्य सामाईक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, कृषी, फार्मसी अभ्यासक्रमांच्या एमएचटी सीईटी परीक्षेचा पीसीएम ग्रुपचा निकाल सोमवारी जाहीर केला. या परीक्षेत राज्यातील २२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत.

त्यात प्रणव मिंत्री, सिद्धांत घाटे आणि गंधार वर्तक या मुंबईतील तिघांचा समावेश आहे.

सीईटी सेलने १९ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान राज्यातील २०७ केंद्रांवर आणि परराज्यातील १७ केंद्रांवर सीईटी घेतली होती. ५ मे रोजी एक अतिरिक्त परीक्षाही घेतली होती. ४ लाख २२ हजार विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. आज पीसीबी ग्रुपचा निकाल यंदा सीईटी सेलने पीसीएम आणि पीसीबी ग्रुपचा निकाल स्वतंत्र जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज, १७ मे रोजी पीसीबी ग्रुपचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

मी जेईई परीक्षा दिली होती. त्यामध्ये माझा देशात २४३ वा रँक आला. दुसरा पर्याय असावा, म्हणून सीईटीही दिली होती. त्यात १०० पर्सेंटाइल मिळतील ही अपेक्षा नव्हती, पण मिळाल्याने आनंद आहे. आयआयटीमध्ये कम्प्युटर इंजिनीअरिंगला प्रवेश घेणार आहे. सध्या आयआयटी- कानपूर मिळाले आहे. सिद्धांत घाटे, (१०० पर्सेंटाइल), घाटकोपर.

‘एमएचटी सीईटी’ परीक्षेच्या तयारीसाठी मी कॉलेजव्यतिरिक्त दररोज ४ ते ५ तास आणि सुट्टीच्या दिवशी ७ ते ८ तास अभ्यास करत होतो. त्यामुळे मला हे यश मिळाले. माझा कल इलेक्ट्रिक इंजिनीअरिंगकडे अधिक आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमाच्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. प्रणव मिंत्री (१०० पर्सेंटाइल), ठाणे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 17-06-2025