गिरणी कामगारांचे पावसाळी अधिवेशनात महाआंदोलन : गोविंद मोहिते

चिपळूण : गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत, यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा करण्याचा एकमुखी ठरावाद्वारे निर्णय राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या (रामिम) कार्यालयात झालेल्या सर्व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस कुंभार्ली येथील गोविंद मोहिते यांनी दिली.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यरत कामगार संघटनांची बैठक घेतली. या वेळी आमदार सचिन अहीर यांच्या नेतृत्वाखाली पावसाळी अधिवेशनात महाआंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच कामगारांना जाचक ठरणारे, अन्यायी कलम १७ रद्द करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. बैठकीला हेमंत धागा जनकल्याण फाउंडेशनचे हेमंत गोसावी, गिरणी कामगार सेनेचे अध्यक्ष सत्यवान उभे, सरचिटणीस बाळ खवणेकर, संयुक्त मराठीचे रमाकांत बने, सर्व श्रमिक संघटनेचे कल्पेश नाडकर्णी, बबन मोरे, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे आनंद मोरे, रवींद्र गवळी आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 17/Jun/2025