दापोली : जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत साखळोली शाळा क्र. १ या शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी ५ लाख निधी मंजूर झाला आहे. इमारतीचे काम जलदगतीने व्हावे आणि ठेकेदार याच्यावर अधिकचा भार पडू नये म्हणून ग्रामस्थानी या इमारतीवरील लाकडी साहित्य, कौले श्रमदानातून काढून दिली. तरीही २० एप्रिल रोजी दुरूस्तीसाठी मोडलेली ही शाळा इमारत दुरुस्तीविना पावसात भिजत आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी या शाळेतील मुलांची गैरसोय झाली.
मुलांना या इमारतीत लवकर बसता यावे म्हणून येथील ग्रामस्थ यांनी दापोली गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेत येथील व्यस्था मांडली तर या इमारतीचे काम रोज होत आहे की नाही, असा मला रिपोर्ट करा, असे गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना सांगितले आहे. १ ते ७ वी पर्यंत असलेली ही शाळा इमारत ४० वर्षे जुनी आहे. त्यामुळे ही इमारत निर्लेखीत करून नवीन इमारत होणे अपेक्षित होते. तशी मागणी देखील ग्रामस्थांची होती.
दरम्यान, दुरुस्तीसाठी साठी निधी मिळाला ते कामही वेळेत नाही, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत तर मुलांची गैरसोय लक्षात घेता इमारत दुरुस्ती लवकर करून दिली जाईल, असे या कामाचे अभियंता यांनी सांगितले.
हे काम व्हावे म्हणून सरपंच दीक्षा तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैभवी गोरीवले, उप सरपंच दिनेश जाधव, मनोज जाधव, मनोज तांबे, यांच्यासह ग्रामस्थ पाठपुरावा करत आहेत.
इमारत लवकर पूर्ण व्हावी म्हणून मी प्रत्यक्ष शाळेला भेट दिली आहे. तर ठेकेदार यांनी १३ जून रोजी रोजी शाळा सुरू होण्यापूर्वी इमारत पूर्ण करून देतो असे सांगितले होते- रामचंद्र सांगडे प्रभारी गटशिक्षणाधिकारी, दापोली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 17/Jun/2025














